पुणे महापालिकेची पाणीपुरवठा देयकांमध्‍ये पालट करण्‍याची पाटबंधारे विभागाकडे विनंती !

शहरासाठी १६.३६ टी.एम्.सी. पाणी कोटा संमत आहे. त्‍यातून शहरास पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा केला जातो; मात्र पाटबंधारे विभागाकडून घरगुतीऐवजी २० पट अधिक दर आकारून महापालिकेला देयके सादर केली जातात. त्‍यामुळे ४५० कोटी रुपयांचे देयक प्राप्‍त झाले आहे.

चिंबल येथील वादग्रस्त उर्दू शाळा बंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

शाळेसाठी अवैधरित्या बांधलेली ३ मजली इमारत आली मोडकळीस अवैधरित्या शाळेची इमारत उभी राहीपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग

‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !

अनेक मासांनंतर विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठका होणार

‘इस्टीमेट्स’ समिती आणि आश्‍वासन समिती यांच्या अनुक्रमे ७ सप्टेंबर अन् १४ सप्टेंबर या दिवशी बैठका होणार आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे.

राजापूर येथे पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना आंबोली येथे अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वाहनावर गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना सावंतवाडी पोलिसांनी आंबोली येथे कह्यात घेतले आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. 

पीडितांच्या हानीभरपाईचे दावे ६ मासांत निकाली काढण्याचा उच्च न्यायालयाचा लवादाला आदेश

बाणस्तारी येथील अपघातामध्ये मृत झालेले आणि घायाळ झालेले यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळण्याविषयीचे दावे पुढील ६ मासांत निकाली काढावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मोटर अपघात दाव्यांविषयीच्या लवादाला दिला आहे.

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

कुरुलकर यांच्‍या अन्‍वेषणात मिळालेली माहिती आणि ए.टी.एस्.ने न्‍यायालयात सादर केलेली कागदपत्रे मिळावीत असा अर्ज बचाव पक्षाचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी न्‍यायालयात दिला, त्‍याला सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी विरोध दर्शवला.

‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.

उल्‍हासनगर येथील मटका आणि जुगार यांच्‍या अड्ड्यांवर धाडी !

उल्‍हासनगर येथील मध्‍यवर्ती आणि हिललाईन पोलीस ठाण्‍यांच्‍या पोलिसांनी मटका, गुडगुडी, सोराट, कल्‍याण मटका, मांगपत्ता जुगार यांच्‍या अड्ड्यांवर धाडी घालून २२ जणांवर गुन्‍हे नोंद केले आहेत.

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी सरकारला आम्‍ही रिक्‍शा भरून कागदपत्रे देतो ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

सरकारने कुठेही न जाता आमच्‍याकडे यावे. आमच्‍याकडे रिक्‍शा भरून कागदपत्रे आहेत. ते पुरावे पाहिल्‍यावर एका दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्‍याविषयीचा अध्‍यादेश काढता येईल, असे प्रतिपादन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.