(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधान !

मंदिरांचे नियम पालन करणे आवश्यक आहे

बेंगळुरू (कर्नाटक) – एकदा मी केरळमधील एका मंदिरामध्ये गेलो होतो. त्यांनी मला माझा शर्ट काढून आत प्रवेश करण्यास सांगितले; मात्र मी मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला. ‘मी बाहेरूनच प्रार्थना करेन’, असे त्यांना सांगितले. त्यांनी रांगेतील प्रत्येकाला शर्ट काढण्यास सांगितले नाही. केवळ काही जणांनाच शर्ट काढण्यास सांगितले जात होते. ही प्रथा अमानवीय आहे.

देवासमोर सर्व जण समान आहेत, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. समाजसुधारक नारायण गुरू यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये पुरुषांना शर्ट काढून आत प्रवेश दिला जातो. या वेळी पुरुषांच्या खांद्यावर शालसारखे कापड ठेवले जाते. अनेक वर्षांपासून ही प्रथा चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रत्येक मंदिरांचे काही नियम असून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. समाजातील अनेक कार्यालयांमध्ये वेगवेगळे नियम असतात, त्याला कुणी विरोध करत नाही. तेव्हा तेथे समानता येत नाही का ?
  •  शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?