‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचे प्रकरण
नवी देहली – मणीपूर सरकारने देशातील संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवला आहे. त्याविरोधात या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी न्यायालयाने मणीपूर सरकारकडे या संदर्भात उत्तर मागितले आहे. या संघटनेने मणीपूर हिंसाचाराविषयी एक अहवाल सादर केला होता. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ‘एडिटर्स गिल्ड’चा अहवाल खोटा आणि बनावट असून गिल्डचे सदस्य राज्यात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप केला होता. तसेच या संघटनेवर गुन्हा नोंदवला होता.
‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने म्हटले होते की, मणीपूरमधील हिंसाचाराचे वार्तांकन करण्याविषयीच्या आमच्या अहवालावर मुख्यमंत्री सिंह यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया धमकीसारखी आहे. आमच्या संघटनेला राज्य आणि देश विरोधी म्हणणे दुःखदायक आहे.