जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे दायित्व अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यावर देण्यात आले आहे. या संदर्भातील अहवाल सिद्ध करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे. या संदर्भात संजय सक्सेना यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. संजय सक्सेना म्हणाले की, लाठीमारासाठी दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, तसेच नोंद झालेल्या गुन्ह्यांविषयी चौकशी केली जाईल. त्यांनी गावकर्यांशीही चर्चा केली.