‘वर्क फ्रॉम होम’ संपताच सौंदर्य उत्पादने महागली !

‘वर्क फ्रॉम होम’ संपताच सौंदर्य उत्पादने महागली आहेत. गेल्या ६ मासांत ५ सहस्र कोटी रुपयांचे लिपस्टिक, नेलपॉलिश आणि आयलायनर यांची विक्री झाली आहे. देशातील मुख्य १० शहरांमध्ये १० कोटींपेक्षा अधिक वस्तू विकल्या गेल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत १९ रुपयांनी वाढ

पाकिस्तान सरकारने देशातील डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या ‘जनमानसातील शिदोरी’ मुखपत्रावर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

रशियाने युक्रेनवरील धान्य निर्यातीच्या प्रमुख मार्गावर केले आक्रमण !

रशियाने युक्रेनमधील डॅन्यूब नदीवर असलेल्या ‘इज्माइल’ नावाच्या बंदरावर आक्रमण केले. येथील धान्याचे एक कोठार नष्ट करण्यात आल्याने धान्याची जागतिक स्तरावरील किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

(म्हणे) ‘अफगाणिस्तानने तालिबानी आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्या भूमीत घुसून कारवाई करू !’ – पाकिस्तान

पाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे !

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.

चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात चिनी सैन्यामध्ये विद्रोहाचे संकेत !

एका सैन्याधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू, तर एक वरिष्ठ अधिकारी आणि परराष्ट्रमंत्री गायब झाल्याचा खळबळजनक घटनाक्रम !

पलवल (हरियाणा) येथे अज्ञातांनी मशिदीची तोडफोड करून लावली आग !

मुसलमान स्वतःहून मशिदींवर आक्रमण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्थानिकांचा आरोप !

(म्हणे) ‘शेजारी देशांशी भारताची भूमिका आक्रमक !’ – पाकिस्तान

‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्‍चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.