पलवल (हरियाणा) येथे अज्ञातांनी मशिदीची तोडफोड करून लावली आग !

मुसलमान स्वतःहून मशिदींवर आक्रमण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्थानिकांचा आरोप !

पलवल (हरियाणा) – पलवल येथे १ ऑगस्टच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी येथील मशिदीची तोडफोड करून पेट्रोल बाँब टाकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी आरोप केला आहे की, हे आक्रमण मुसलमानांनीच केले आहे. यामागे या भागातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यापूर्वी १ ऑगस्टच्या सकाळी काही जणांनी २ ट्रकला आग लावली होती, तर मुसलमानांच्या ३० झोपड्यांना आग लावली होती. तसेच गुरुग्राम येथे एका मशिदीची तोडफोड केली होती. तेथे एका मुसलमानाचा मृत्यू झाला होता. हे आक्रमणही मुसलमानांनी केल्याचा दावा केला जात आहे.

संपादकीय भूमिका

यातून धर्मांध मुसलमान डावपेचांत किती हुशार आहेत, हे लक्षात येते ! आता अशा घटनांवरून निधर्मीवादी राजकीय पक्ष हिंदूंना तालिबानी ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करतील !