वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्ध थांबलेच पाहिजे. मी आज एक अहवाल पाहिला. त्यानुसार गेल्या ३ दिवसांत सहस्रो लोक मरण पावले आहेत. ते सैनिक असोत किंवा सामान्य लोक, आम्ही त्यांच्यासाठी काम करू, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ‘आमचे प्रशासन पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करेल’, असेही ते म्हणाले.