(‘उटा’ (UTAA) युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स ही आदिवासी किंवा अनुसूचित जमात यांची संघटना आहे.)
पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०११ मध्ये बाळ्ळी येथे झालेल्या ‘उटा’ आंदोलनाच्या वेळी झालेल्या जळीतकांड प्रकरणी विदेशात पसार झालेला संशयित बरकत अली (वय ४७ वर्षे) याला ‘सीबीआय’च्या गोवा विभागाने कह्यात घेतले आहे. वर्ष २०१५ मध्ये तो सौदी अरेबिया येथे पसार झाला होता.
२५ मे २०११ या दिवशी ‘उटा’ आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या वेळी झालेल्या जाळपोळीमध्ये मंगेश गावकर (काणकोण) आणि दिलीप वेळीप (केपे) यांचा जळून मृत्यू झाला होता. ‘सीबीआय’ने चौकशीच्या अंती हे प्रकरण सदोष मनुष्यवधाच्या खाली नोंद करून नवीन आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी न्यायालयाने पसार झालेला संशयित बरकत अली याला वगळून इतर संशयितांची पुराव्याच्या अभावी निर्दाेष सुटका केली होती. बरकत अली सौदी अरेबियाची राजधानी रियाध शहरात असल्याची माहिती मिळाल्यावर ‘इंटरपोल’ पोलिसांच्या साहाय्याने त्याला कह्यात घेण्यात आले. ‘सीबीआय’चे पथक १३ नोव्हेंबर या दिवशी त्याला घेऊन गोव्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, अशा धर्मांधांना ओळखा ! |