सतर्क नागरिकांनी सोडवल्याने जीव वाचला
नेरळ – नेरळ कुंभार आळी येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ खेळणारा मनीष पाटील (वय साधारणतः १३-१४ वर्षे) चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकला. विजेचा जोरात धक्का लागून तो डीपीला साधारण दीड मिनिटे चिकटला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला सोडवले. त्यामुळे तो वाचला. त्याची शुद्ध हरपली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. नेरळ शहरातील धोकादायक असणार्या विजेच्या खांबांविषयी वारंवार तक्रारी करूनही त्याची गांभीर्याने नोंद घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.