‘ए.डी.ए.आर्.’ या स्वयंसेवी संस्थेचा अहवाल !
नवी देहली – ‘ए.डी.ए.आर्.’ या स्वयंसेवी संस्थेने २८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथील ४ सहस्र ३३ पैकी ४ सहस्र १ आमदारांच्या निवडणूकपूर्व शपथपत्रांच्या आधारे संपत्तीचे विश्लेषण करून अहवाल बनवला आहे. यात म्हटले आहे की, या ४ सहस्र आमदारांकडे एकूण ५४ सहस्र ५४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम राज्यांच्या वर्ष २०२३-२४ च्या एकूण अर्थसंकल्पापेक्षा ही रक्कम अधिक आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३ कोटी ६३ लाख रुपये आहे. हे आमदार ८४ राजकीय पक्षांचे असून त्यात अपक्षांचाही समावेश आहे.
4001 विधायकों की संपत्ति इन 3 राज्यों के बजट से है ज्यादा, BJP से अमीर हैं कांग्रेस और YSRCP के MLA https://t.co/9q6OgOV9ku
— AajTak (@aajtak) August 2, 2023
कर्नाटकातील काँग्रेस आमदार आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते देशातील सर्वांत श्रीमंत आमदार आहेत. ९५ अपक्ष आमदारांकडे एकूण २ सहस्र ८४५ कोटी रुपये आहेत. भाजपच्या १ सहस्र ३५६ आमदारांची संपत्ती १६ सहस्र २३४ कोटी आणि काँग्रेसच्या ७१९ आमदारांची संपत्ती १५ सहस्र ७९८ कोटी आहे. एकूण संपत्तीमध्ये या दोन प्रमुख पक्षांच्या आमदारांचा एकूण वाटा ५८.७३ टक्के आहे.
संपादकीय भूमिकासर्वसामान्य व्यक्ती ४० वर्षे नोकरी करून किंवा एखादा व्यवसाय करून जितकी संपत्ती गोळा करू शकत नाही, त्याहून कितीतरी पटींनी अधिक संपत्ती लोकप्रतिनिधी त्यांच्या अल्प कार्यकाळात गोळा करतात. यामागील कारण भ्रष्टाचार हाच आहे, हे जनतेला ठाऊक आहे ! |