बोगस खतविक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

भिवंडी येथील त्रस्‍त शेतकर्‍याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी खत पाण्‍यात न विरघळता प्‍लास्‍टिकचे गोळे सिद्ध होत असल्‍याचा अजब प्रकार !

मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ सातारा येथे जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

नवी मुंबईत स्‍वच्‍छ भारत सर्वेक्षणामुळे ए.पी.एम्.सी. लगतचा परिसर स्‍वच्‍छ !

सर्वेक्षणाचे पथक येणार म्‍हणून स्‍वच्‍छता करण्‍यापेक्षा परिसर कायमच स्‍वच्‍छ रहाण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ?

कराड-निपाणी-बेळगाव रेल्‍वेमार्गाचे काम चालू करा ! – रेल्‍वेमंत्र्यांना निवेदन

हा रेल्‍वे मार्ग पूर्णत्‍वास गेल्‍यास कर्नाटक-महाराष्‍ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे. या प्रसंगी महाराष्‍ट्र भाजपचे उपाध्‍यक्ष श्री. अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप अध्‍यक्ष श्री. संजय पाटील उपस्‍थित होते.

पुणे येथील ‘पाषाण-बाणेर लिंक’ रस्‍त्‍यासाठी सक्‍तीने भूसंपादनाचे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे महापालिकेला आदेश !

रहिवाशांना ३० वर्षे त्रास सहन करावा लावणारे संवेदनाशून्‍य महापालिका प्रशासन कधीतरी जनहित साधू शकेल का ? शेवटी न्‍यायालयालाच आदेश द्यावा लागतो, तर प्रशासनाचा एवढा मोठा डोलारा हवा कशाला ?

समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी पैशांच्‍या मागणीचा आरोप !

समाजकल्‍याण विभागात स्‍थानांतरासाठी प्रत्‍येकाकडून ४० लाख रुपये घेतले जातात. समाजकल्‍याण विभागाच्‍या एका महिला उपायुक्‍तांचे याविषयीचे १५ मिनिटांचे ध्‍वनीमुद्रण उपलब्‍ध असून त्‍यामध्‍ये मुख्‍यमंत्र्यांचेही नाव आहे.

कळवा येथे वृक्ष उन्‍मळून पडल्‍याने २ जण घायाळ !

या घटनेमुळे शहरातील वृक्षांचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. घायाळांना उपचारांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्राचे नायक छत्रपती शिवाजी महाराजच ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कोविड काळात भ्रष्‍टाचार करणार्‍यांना सोडणार नाही. ऑक्सिजन प्‍लांट कालबाह्य झालेले वापरण्‍यात आले, हा अहवाल आहे. ‘डेड बॅग’मध्‍ये (मृतदेहांसाठी वापरण्‍यात येणारी बॅग) घोटाळा करण्‍यात आला.

कोपरखैरणे येथे महारक्‍तदान आणि महाआरोग्‍य तपासणी शिबिराला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

लायन्‍स क्‍लब ऑफ न्‍यू बाँबे, तुर्भे यांच्‍या वतीने नेत्रचिकित्‍सा आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्‍यात आले होते. ज्‍या व्‍यक्‍तींना मोतिबिंदू झाल्‍याचे तपासणीमध्‍ये निदान झाले

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही ! – एन्.सी.सी.

या घटनेच्‍या तीव्र प्रतिक्रिया ४ ऑगस्‍टला ठाणे येथे उमटल्‍या. राष्‍ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या राजकीय पक्षांच्‍या कार्यकर्त्‍यांनी महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले.