बोगस खतविक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

  • भिवंडी येथील त्रस्‍त शेतकर्‍याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

  • खत पाण्‍यात न विरघळता प्‍लास्‍टिकचे गोळे सिद्ध होत असल्‍याचा अजब प्रकार !

ठाणे, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – भिवंडीत बोगस खतविक्री होत आहे. शेतकर्‍याने शेतात टाकलेले खत पाण्‍यात न विरघळता त्‍यातून प्‍लास्‍टिकचे गोळे सिद्ध होत आहेत. त्‍यामुळे शेतकरी त्रस्‍त झाले आहेत. या प्रकरणी ३ ऑगस्‍टला त्रस्‍त शेतकरी शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांच्‍याकडे निवेदन देऊन ‘बोगस खत विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.