नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्‍यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्‍ट्राला भरभरून दिले आहे. सध्‍या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्‍ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता सध्‍या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची … Read more

छत्रपती संभाजीनगर येथे वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍यांवर महानगरपालिकेकडून कारवाई !

महानगरपालिका आणि सिडको वाहतूक विभागाच्‍या वतीने २८ जून या दिवशी सकाळी सेंट्रल नाका ते एम्.जी.एम्. प्रवेशद्वारापर्यंत कारवाई करण्‍यात आली. या कारवाईमध्‍ये ४० सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला…

कोल्‍हापूर येथे ८ जुलैला स्‍वातंत्र्यवीर सावरकर जलतरण चषक स्‍पर्धा !

८ जुलै १९१० या दिवशी स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रसिद्ध अशी मार्सेलीस उडी मारली. या उडीने तत्‍कालीन ब्रिटीश सरकार तर हादरलेच; पण ही उडी जगभरात चर्चेचा विषय बनली. या उडीच्‍या स्‍मरणार्थ ‘सावली सोशल सर्कल’च्‍या वतीने शालेय विद्यार्थ्‍यांसाठी ‘सावरकर जलतरण चषक’ या नावाने पोहण्‍याची स्‍पर्धा आयोजित केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलैमध्‍ये राज्‍याचा मंत्रीमंडळ विस्‍तार होणार; निर्णय मुख्‍यमंत्री घेणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून या रात्री विलंबाने देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्‍ताराचे सूत्र ठरल्‍याची माहिती आहे.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्‍या दोन चाचण्‍या करण्‍याचा प्रस्‍ताव !

डॉ. प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्‍हाईस लेयर अ‍ॅनालिसिस चाचणी करण्‍याची अनुमती आतंकवादविरोधी पथकाने न्‍यायालयात मागितली होती

पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ !

रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांकडून विविध ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

धर्मांतर करण्‍यासाठी आलेल्‍या महिलांची सखोल चौकशी करण्‍याची मागणी !

पुणे जिल्‍ह्यातील दौंड येथून ३ ख्रिस्‍ती महिला काष्‍टी येथे रहाणारे मयूर मदरे यांच्‍या घरी बळजोरीने घुसल्‍या. त्‍यांनी मयूर आणि त्‍याची आई यांना ‘तुम्‍ही ख्रिस्‍ती धर्मात प्रवेश करा म्‍हणजे तुमची सर्व संकटे आणि अडचणी दूर होतील, तसेच तुमच्‍या मुलाचे लग्‍नही होईल’, असे सांगून कपाळाला तेल लावले अन् येशू ख्रिस्‍ताची प्रार्थना म्‍हणण्‍यास आरंभ केला.

आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथे २ लाख भाविकांनी घेतले दर्शन !

आषाढी एकादशीनिमित्त जिल्‍ह्यातील पैठण येथे २ लाख भाविकांनी श्री पांडुरंगाची मूर्ती आणि नाथ पादुका यांचे दर्शन घेतले. पहाटे ४ वाजता येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्‍या वाड्यातील विजयी पांडुरंगाच्‍या मूर्तीला नाथ वंशजांच्‍या हस्‍ते महाअभिषेक करण्‍यात आला. पहाटे ४ वाजल्‍यापासून दक्षिण काशी म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या गोदावरी नदीत गोदास्नान करून विजयी पांडुरंगाच्‍या मूर्तीचे दर्शन घेतले.

#Exclusive : मदरसेच जागतिक रक्तपातामागील मूळ कारण ! – लंडन येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया

फ्रान्समध्ये फ्रेंच पोलिसांनी एका अरब तरुणाची हत्या केल्यावरून तेथील सहस्रावधी धर्मांध मुसलमान हैदोस घालत आहेत, तेथे देशव्यापी हिंसाचार उसळला आहे. यावरून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अजाकिया यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.

(म्हणे) ‘मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेल्या अप्रसन्नतेवरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव !’ – शरद पवार

देशातील जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अप्रसन्नता आणि अस्वस्थता आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव आणण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.