छत्रपती संभाजीनगर – महानगरपालिका आणि सिडको वाहतूक विभागाच्या वतीने २८ जून या दिवशी सकाळी सेंट्रल नाका ते एम्.जी.एम्. प्रवेशद्वारापर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ४० सहस्र २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सेंट्रल नाका ते एम्.जी.एम्. मणीयार चौकापर्यंत महानगरपालिकेने सिद्ध केलेला सिमेंट रस्ता आणि पदपाथ यांवर काही नागरिकांनी स्वत:च्या बंद पडलेल्या चारचाकी गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला आणि नागरिकांना पायी चालण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यांच्याविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २४ दुचाकी आणि ३ चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. गजानन महाराज मंदिर परिसरात फुलझाडे, कुंडे आणि मातीचे मडके विकणार्यांवरही कारवाई करण्यात आली असून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.