मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग !

वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !

पाकच्या नागरिकांची हज यात्रा रहित होण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकचे असेच दिवस येणार आहेत, याच आश्‍चर्य ते काय ?

‘७२ हूरें’च्या ट्रेलरला (विज्ञापनाला) प्रमाणपत्र न दिल्याचे वृत्त अफवा ! – केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

मंडळाने म्हटले आहे, ‘ही अफवा आहे. ट्रेलरला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे.

३० मिनिटांच्या नमाजपठणामुळे कोणतीही हानी होत नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाने एका मंदिराच्या मार्गावरील नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली ! यावर हिंदूंनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेच भाविकांना वाटेल !

गोव्यात मागील ६ मासांत ४ सहस्र ७०० हून अधिक वाहनधारकांची अनुज्ञप्ती तात्पुरती रहित

दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !

गोवा : कदंब महामंडळाच्या बसवर असलेल्या गुटख्याच्या विज्ञापनांना ३५० शिक्षकांचा आक्षेप !

एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही‘‘. याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्‍या महसुलाला काहीच किंमत नाही !

मडगाव (गोवा) येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला मदरसा तात्पुरता बंद

रुमडामळ पंचसदस्य वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून वातावरण अशांत झाले होते. श्री. वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती.

स्वार्थी राजकारणी आणि नि:स्वार्थी साधक !

‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उत्तराखंडच्‍या बद्रीनाथ धाममध्‍ये बकरी ईद साजरी न करण्‍याचा निर्णय

पुरोला आणि बरकोट येथे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात तणाव निर्माण झाला होता आणि हिंदू रस्‍त्‍यावर उतरले होते. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

पाकिस्‍तानने पकडलेल्‍या मासेमारांच्‍या कुटुंबियांना अर्थसाहाय्‍य !

भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्‍तानच्‍या सागरी सीमेत गेल्‍यामुळे पाकिस्‍तानने पकडलेल्‍या महाराष्‍ट्रातील मासेमारांच्‍या कुटुंबियांना दरमासाला ३०० रुपये आर्थिक साहाय्‍य करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे.