मराठवाडा मुक्‍तीसंग्राम स्‍मारकासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांची तरतूद !

मराठवाडा मुक्‍तीसंग्रामाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यांमध्‍ये यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी ५० लाख रुपयांचे प्रावधान करण्‍यात आले आहे.

‘महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजने’च्‍या लाभधारकांना राज्‍यशासन देणार ओळखपत्र !

राज्‍यातील २ कोटी लाभधारकांना ओळखपत्र देण्‍यात येणार आहे. महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेच्‍या अंतर्गत दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये अर्थसाहाय्‍य करण्‍याचा निर्णय २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने  श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्‍या रूपात पूजा !

आषाढी एकादशीच्‍या पार्श्‍वभूमीवर कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्‍या रूपात पूजा बांधण्‍यात आली होती.

पवनी (जिल्‍हा नागपूर) येथे दोघांना ठार मारणार्‍या वाघाचा बंदोबस्‍त न केल्‍याने ग्रामस्‍थांचे वनकर्मचार्‍यांवर आक्रमण !

२ दिवसांपूर्वी याच परिसरातील गुडेगाव येथील एकाला वाघाने ठार केले होते. त्‍यामुळे अगोदरच ग्रामस्‍थांमध्‍ये वन विभागाच्‍या विरोधात असंतोष होता.

संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनांच्‍या अर्थसाहाय्‍यात वाढ !

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्तीवेतन योजना यांच्‍या अर्थसाहाय्‍यात प्रतीमास ५०० रुपये इतकी वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेतला.

मी त्‍या ताईवर उपकार केले नसून मी माझे कर्तव्‍य पार पाडले !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. लेशपाल जवळगे आणि श्री. हर्षद पाटील यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून त्‍यांचे कौतुक केले आणि शुभेच्‍छा दिल्‍या.

श्री शनिशिंगणापूर देवस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेची सव्‍वाचार लाखांची फसवणूक !

कलियुगात मनुष्‍याची पातळी इतकी खालावली आहे की, तो देवालाही फसवायला मागेपुढे पहात नाही, मनुष्‍याचे याहून दुसरे अधःपतन काय असू शकते ? यावरून समाजाला धर्मशिक्षण देणे का आवश्‍यक आहे, हे लक्षात येते !

‘सनातन सेन्‍सॉर मंडळ’ हवेच !

चित्रपटांमध्‍ये अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांविषयी निधर्मीपणा दाखवणारे ‘सेन्‍सॉर मंडळ’ हिंदूंच्‍या देवतांच्‍या विडंबनाविषयी गप्‍प का असते ?

केक आणि तलवार

तिथीनुसार वाढदिवस साजरा करतांना औक्षण केल्‍याने देवतेचे तत्त्व ज्‍याचा वाढदिवस आहे, त्‍याला मिळते. औक्षण करतांना श्रीरामरक्षेतील ‘शिरो मे राघवः पातु’ ते ‘विजयी विनयी भवेत’पर्यंतचे श्‍लोक म्‍हणावेत. त्‍यामुळे संपूर्ण शरिराभोवती संरक्षणकवच निर्माण होते.’

वन विभागाचा तपासणी नाका चालू झाल्‍याने रात्रीच्‍या वेळी सिंहगडावर जाणार्‍यांना चाप !

भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसहा ते सात वाजल्‍यानंतर कोंढणपूर फाट्यावरून गडाकडे जाणारा दरवाजा बंद करण्‍यात येतो. याठिकाणी कर्मचारी तैनात करण्‍यात आले आहेत.