उत्तराखंडच्‍या बद्रीनाथ धाममध्‍ये बकरी ईद साजरी न करण्‍याचा निर्णय

बद्रीनाथ धाम

बद्रीनाथ (उत्तराखंड) –  उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाममध्‍ये बकरी ईद साजरी केली जाणार नाही. बद्रीनाथ हे छोटा चारधाम यात्रेचाही थांबा आहे. यात्रेच्‍या वेळी प्रतिवर्ष लाखो भाविक येथे येतात. बद्रीनाथमध्‍ये रहाणार्‍या मुसलमानांसमवेत पोलीस-प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत येथील मुसलमानांनी ४५ किलोमीटर दूर असलेल्‍या जोशीमठ येथे जाऊन तिथे बकरी ईद साजरी करण्‍याचा निर्णय घेतला. मुसलमान प्रतिनिधींनी या निर्णयाला आपला कोणताही आक्षेप नसल्‍याचे लेखी दिले.

पुरोला आणि बरकोट येथे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या विरोधात तणाव निर्माण झाला होता आणि हिंदू रस्‍त्‍यावर उतरले होते. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्‍यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बद्रीनाथच्‍या पांडा समाज आणि पुजारी यांनी मंदिराच्‍या परिसरात किंवा हनुमान चटीमध्‍ये बकरी ईद साजरी केल्‍यास आंदोलन करू, अशी चेतावणी दिली होती.