‘७२ हूरें’च्या ट्रेलरला (विज्ञापनाला) प्रमाणपत्र न दिल्याचे वृत्त अफवा ! – केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

( ७२ हुरे  ही इस्लामी संकल्पना असून त्यानुसार इस्लामचे काटेकोर पालन करणारे स्वर्गात गेल्यावर त्यांना ७२ सुंदर युवतींचा सहवास लाभतो.)

मुंबई – ‘७२ हुरें’ या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ‘केवळ प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र दिले आहे; मात्र त्याच्या ट्रेलरला (विज्ञापनाला) प्रमाणपत्र दिलेले नाही, असे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर आता मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे.

मंडळाने म्हटले आहे, ‘ही अफवा आहे. ट्रेलरला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे. निर्मात्यांना या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ती प्राप्त झाल्यावर त्याच्या पडताळणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.’ विशेष म्हणजे प्रमाणपत्र न मिळताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित झाला आहे.