बालिंगा (जिल्हा कोल्हापूर) येथे सराफाच्या दुकानावर फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा !

भर चौकात दरोडेखोरांनी केला गोळीबार !

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील बालिंगा गावातील कात्यायनी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकल्याची घटना ८ जून या दिवशी घडली आहे. दरोडेखोरांनी बाजारपेठेत ७ ते ८ बंदुकीच्या फैर्‍या झाडत दहशत माजवली आणि त्यानंतर त्यांनी दुकानाच्या मालकाला मारहाण करत दुकानातील सोन्याचे दागिने पोत्यात भरून गगनबावड्याच्या दिशेन पोबारा केला. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. घटनेचा पंचनामा चालू असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी सांगली येथील रिलायन्स ज्वेल्स दुकानावरील पडलेल्या दरोड्यानंतर २ दिवसांतच अशाच पद्धतीने दरोडा पडल्याने पोलिसांच्या समोर दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका 

एका मागोमाग एक दरोडे पडणे, हे गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !