१६ ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून सौ. उज्वला गावडे, श्री. शरतकुमार नाईक, श्री. सुनील घनवट आणि श्री. व्यंकटेश शिंदे

बेळगाव – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले. ते बेळगाव येथे १० जून या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी हमारा देश संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर कन्नड समन्वयक श्री. शरतकुमार नाईक, रणरागिणी शाखेच्या सौ. उज्ज्वला गावडे या उपस्थित होत्या.