साक्षी आणि अनुराधा यांची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी मंचर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

मंचर (जिल्हा पुणे) – देहलीमध्ये साक्षी नावाच्या तरुणीची २५ वेळा चाकू भोसकून आणि तीन वेळा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. झारखंडमध्ये अनुराधा नावाच्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपी धर्मांधांना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी पारस लॉज समोर मंचर येथे ५ जून या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला २०० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी हातात निषेधाचे फलक धरून आणि निषेधाच्या घोषणा देत जागृती करण्यात आली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे, भाजपचे श्री. भानुदास नाना काळे आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. जागृती महाजन यांनीही या वेळी आपले मत व्यक्त केले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री. सुनील बाणखेले, काजळे भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. सागर, मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. वैभव बाणखेले यांखेरीज अन्य समविचारी संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.

‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी धर्माचरण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणे आवश्यक ! – संजय थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांनी गांजलेल्या रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. आता त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आज हिंदु समाज निद्रिस्त आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. छत्रपतींच्या जन्मभूमी जवळच ‘लव्ह जिहाद’ची घटना घडते हे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. अशा घटना रोखण्यासाठी आपण धर्माचरण, धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.

प्रत्येक माता-भगिनीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

कु. क्रांती पेटकर

मुघलांच्या काळात आक्रमणात पकडलेल्या स्त्रियांची भर बाजारात २ दिनारात विक्री केली जायची. आताच्या काळात आमच्या माता भगिनींचे प्रत्येक जातीनिहाय दरपत्रक सिद्ध केले आहे. आज प्रत्येक तरुणीने आणि तिच्या पालकांनी धर्माचरण केले पाहिजे, तसेच प्रत्येक माता-भगिनीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे.

लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी संघटीत होऊन प्रयत्न केले पाहिजेत ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

श्री. पराग गोखले

आज देशभरात २ लाख ६५ सहस्र तरुणी गायब आहेत. बजरंग दलाने ‘हेल्पलाईन’ चालू केल्यावर एका दिवसात ८५ सहस्र तरुणींनी संपर्क केला. यावरून लव्ह जिहाद किती फोफावला आहे, हे लक्षात येते. या घटनांना आळा घालण्यासाठी संघटीत होऊन प्रयत्न केले पाहिजेत.
या आंदोलनात बाबुगेनू प्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.