समाजातील युवा पिढीने थोर पुरुषांचे विचार पुढे नेण्याचे कार्य करावे ! – अजित पवार

पुणे – कळस येथे स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते झाले. जाती-धर्माचे राजकारण न करता १८ पगड जातीच्या लोकांनी एकत्र कसे रहावे हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून पायाभरणी केल्यामुळे आज समाजातील सर्व धर्मातील लोक एकत्र रहात आहेत. युवा पिढीने थोर पुरुषांचे स्मरण करून त्यांचे विचार आत्मसात् करून ते पुढे नेण्याचे कार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार सुनील टिंगरे यांनी केले होते, तर प्रास्ताविक माजी नगरसेवक सतीश मस्के यांनी केले.