लाचखोर सुनीता धनगर यांच्याकडे ८५ लाखांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले !
नाशिक – येथील महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (‘एसीबी’च्या) पथकाने अटक केली आहे. त्यांच्यासमवेत कर्मचारी नितीन जोशी यांनाही ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे. ‘एसीबी’च्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशाने पथकाने सुनीता यांच्या घराची झडती घेतली असता लाचखोर सुनीता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपयांची रोकड आणि ३२ तोळे सोने सापडले आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेले महापालिका प्रशासन ! |