सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ते विराजमान असलेला रथ ओढण्याची सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले अनुभूतीरूपी कृतज्ञतापुष्प !

‘ज्याप्रमाणे मंदिरातील देवतेचा रथ तेथील सेवेकरी ओढतात, त्याप्रमाणे श्रीमन्नारायणाचा रथ साधकांनी ओढावा’, या सप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी साक्षात् भगवंताचा हा रथ ओढला.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात त्यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा चालू झाल्यानंतर शारीरिक श्रम एकदम वाढल्यामुळे माझे शरीर दुखू लागले.

वर्ष २०२३ मधील रथोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना साजेसा रथ बनवण्याची मनातील इच्छा गुरुकृपेने पूर्ण झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

वर्ष २०२२ चा रथोत्सव झाल्यावर एक सूत्र शिकता आले. त्या रथाचा आकार कसाही असला, तरी प.पू. गुरुदेव रथात बसल्यावर रथाच्या त्या आकारातही देवत्व निर्माण झाले होते. ‘भगवंताने साधकांना रथाचा रंग आणि रूप यांच्या पलीकडे नेऊन निर्गुण तत्त्वाची अनुभूती दिली’, असे मला जाणवले.