उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार

औद्योगिक विकास महामंडळाकडून सुचवण्यात आलेल्या रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील जागांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास आणि पहाणी संबंधित आस्थापनेकडून केली जाणार आहे. 

रत्नागिरीला येत असतांना दहिसरचे मनसे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू

मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्‍या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल -उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग : आचरा येथे गोळीबार आणि प्राणघातक आक्रमण करणार्‍या दोघांना पोलीस कोठडी

या आक्रमणात चारचाकीतील गौरव पेडणेकर घायाळ झाला. तसेच चारचाकीतील अन्य युवकांवर गोळीबार करण्यात आला; मात्र ते सुदैवाने वाचले. यातील जुवाटकर हा घटनास्थळावरून पसार झाला, तसेच तौकिर आणि प्रतीक हडकर हे पळून जात असतांना ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवेत घेण्याच्या निर्णयामुळे डी.एड्. बेरोजगार संतप्त

डी.एड्. पदविकेत मिळवलेली गुणवत्ता असतांना पुन:पुन्हा गुणवत्ता का तपासली जात आहे ? केवळ  परीक्षांचा मांडलेला खेळ, १० वर्षांत परीक्षांसाठी शुल्क आकारून  भरलेली तिजोरी, प्रमाणपत्रांचा उघड झालेला भ्रष्टाचार यामुळे आता कुणाचाच परीक्षांवर विश्‍वास राहिलेला नाही.

हणजूण येथील ‘हाऊस ऑफ चापोरा’ या उपाहारगृहावर गोवा पोलिसांची धाड

या धाडीमध्ये मिळालेले पदार्थ रासायनिक विश्‍लेषण करण्यासाठी पाठवण्यात आले असून याविषयीच्या अहवालात त्या पदार्थांमध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

गोव्यात १२ वीचा निकाल ९५.४६ टक्के

बारावीच्या परीक्षेचा सविस्तर निकाल https://results.gbshse.net/#/  आणि https://www.gbshse.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपट गोवा शासनाने करमुक्त करावा ! – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

मध्यप्रदेश शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे गोवा शासनाने गोव्यातही हा चित्रपट करमुक्त करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादची भीषणता प्रत्येक हिंदु युवतीपर्यंत पोचण्यासाठी शासनाने हातभार लावावा.

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि ईश्वराची आराधना करणारे साधक यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले