पणजी – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’ची भीषण वास्तविकता जगासमोर आणण्याचा प्रयत्न प्रथमच कुणीतरी केला आहे. केरळमधील ज्या ३२ सहस्र मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आणि ज्यांचा आतंकवादासाठी उपयोग करण्यात आला, त्याची भीषणता सांगणारा हा चित्रपट आहे.
लव्ह जिहादचे भीषण वास्तव लक्षात येण्यासाठी सर्व हिंदु युवती आणि पालक यांनी हा चित्रपट अवश्य पहावा, असे मी आवाहन करतो.
मध्यप्रदेश शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे गोवा शासनाने गोव्यातही हा चित्रपट करमुक्त करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादची भीषणता प्रत्येक हिंदु युवतीपर्यंत पोचण्यासाठी शासनाने हातभार लावावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केली आहे.