हानीभरपाई देण्‍यासाठी ७ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारून तलाठी पसार !

सोलापूर – राष्‍ट्रीय महामार्गासाठी बाधित झालेल्‍या पाईपलाईनची हानीभरपाई काढून देण्‍यासाठी ७ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारल्‍याच्‍या प्रकरणी प्रांत कार्यालयातील तलाठी सूरज नळे आणि खासगी कर्मचारी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. लाचखोर तलाठी लाचेची रक्‍कम घेऊन चारचाकी वाहनातून पसार झाले आहेत. नागपूर-रत्नागिरी या महामार्गासाठी बाधित झालेल्‍या तक्रारदाराच्‍या पाईपलाईनची भरपाई १ लाख ४३ सहस्र ७९४ रुपये संमत करण्‍यासाठी दोघांनी ७ सहस्र रुपयांची मागणी केली होती.

संपादकीय भूमिका 

  • भ्रष्‍टाचाराने पोखरलेला प्रशासकीय विभाग
  • प्रशासकीय विभागातील लाचखोरांना कठोर शिक्षा केल्‍याविना लाच घेण्‍याचे प्रकार थांबणार नाहीत !