जुन्नर (पुणे), ३० मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील आश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने २९ आणि ३० मार्च या २ दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प.पू. बर्फानी महाराज (मोरटक्का, मध्यप्रदेश), प.पू.भक्तराज महाराजांचे जेष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि प.पू.बाबांचे शिष्य श्री.शशिकांत ठुसे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प.पू. भक्तराज महाराजांचे भक्त या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
३० मार्च या दिवशी सकाळी सकाळी ९ ते १० या वेळेत प्रभु श्रीरामचंद्रास अभिषेक आणि आरती, तसेच प.पू.भक्तराज महाराजांच्या समाधीस अभिषेक आणि आरती करण्यात आली.
सकाळी १० ते ११ या वेळेत श्री. समृद्ध कुटे यांच्या बासरी वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ११ ते १२ या वेळेत कु. ओंकार सुनिल गुंजाळ महाराजांचे प्रभु श्रीरामचंद्रावर प्रवचन झाले.