नव्‍या आर्थिक वर्षापासून ‘भीम’ प्रणाली होणार सशुल्‍क !

नवी देहली – केंद्रशासनाची ‘भीम’ ऑनलाईन आर्थिक व्‍यवहार करणारी प्रणाली आता सशुल्‍क करण्‍यात आली आहे. नवीन आर्थिक वर्षापासून आता शुल्‍क भरावे लागणार आहे. सर्वसामान्‍य ग्राहकांना भीम प्रणालीद्वारे पैशांचे व्‍यवहार केल्‍यावर ०.५ टक्‍क्‍यापासून १.१ टक्‍क्‍यांपर्यंत शुल्‍क भरावे लागणे अपेक्षित आहे.