यवतमाळ येथे २ ठिकाणी ५१ फुटी रामध्‍वजाची पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते स्‍थापना !

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ – श्रीरामनवमीनिमित्त येथे जय हिंद चौक आणि माळीपुरा येथील गणपतीच्‍या मंदिरासमोर ५१ फुटी रामध्‍वजाची स्‍थापना पालकमंत्री संजय राठोड यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली.

माळीपुरा येथील गणपतीच्‍या मंदिरासमोर ध्‍वज फडकवण्‍यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रेय फोकमारे यांनी हिंदु राष्‍ट्राची प्रतिज्ञा सर्वांकडून म्‍हणून घेतली. या वेळी ५०० हून अधिक धर्माभिमानी उपस्‍थित होते.

या वेळी श्रीरामनवमी उत्‍सव समितीचे श्री. मनोज औदार्य, नवदुर्गा उत्‍सव मंडळाचे श्री. अनिल शर्मा, माजी नगराध्‍यक्ष श्री. सुभाष रॉय, यवतमाळ अर्बन बँकेचे श्री. अजय मुंदढा, शिवसेनेचे सर्वश्री पराग पिंगळे, निरव गढिया आणि प्रवीण निमोदीया उपस्‍थित होते.