देशातील ९० टक्के मुसलमान धर्मांतरित !

बिहारमधील बांधकाममंत्री अशोक चौधरी यांचा दावा !

बिहारमधील बांधकाममंत्री अशोक चौधरी

नालंदा (बिहार) – देशातील ९० टक्के मुसलमान धर्मांतरित आहेत. ते लंडन, अमेरिका किंवा अफगाणिस्तान येथून आलेले नाहीत. ते पूर्वी दलित होते आणि ब्राह्मण व्यवस्थेतील अस्पृश्यतेला कंटाळून मुसलमान झाले; कारण मुसलमानांमध्ये अस्पृश्यता नाही, असा दावा बिहारचे सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे आमदार आणि बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी एका सभेमध्ये केला. (अस्पृश्यतेला कंटाळून नाही, तर तलवारीच्या धाकामुळे त्यांचे धर्मांतर करण्यात आले, हाच इतिहास आहे. त्यातही दलित अधिक प्रमाणात होते, असेही इतिहासतज्ञ सांगतात. अशा प्रकारे चौधरी ब्राह्मणद्वेष पसरवत आहे. जर चौधरी यांना तसे वाटते, तर ‘आता या देशात अस्पृश्यता राहिलेली नाही, मग धर्मांतरित मुसलमान पुन्हा हिंदू का होत नाहीत ?’, असे चौधरी त्यांना विचारतील का ?- संपादक)

बिहार सरकारने रमझानच्या काळात मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना कार्यालयांमध्ये एक घंटा लवकर येथून लवकर जाण्याची मुभा दिली आहे. त्याचे समर्थन करतांना ते बोलत होते.
अशोक चौधरी यांनी या वेळी भाजपवरही टीका केली. सरकारच्या निर्णयानंतर भाजपने ‘नवरात्रीच्या वेळी हिंदु कर्मचार्‍यांनाही अशी मुभा द्यावी’, अशी मागणी केली आहे. त्यावर चौधरी म्हणाले की, भाजप हिंदु आणि मुसलमान असा भेद करण्यासाठीच अशी मागणी करत आहे. अल्पसंख्यांकांना मुभा देण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहे. (अनेक वर्षांपासून केवळ मुसलमानांनाच मुभा देण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदूंनाही ती द्यावी, असे चौधरी यांना का वाटत नाही ? ही राजकीय अस्पृश्यता नाही का ? – संपादक)

(सौजन्य : zee बिहार झारखंड)

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर कुणी त्यांना परत त्यांच्या मूळ धर्मात, म्हणजे हिंदु धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा कुणी स्वच्छेने परत येत असेल, तर त्यात चुकीचे ते काय ?