अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यावरून माकपच्या आमदाराची आमदारकी रहित !

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

कोच्ची (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए. राजा यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे घोषित करत त्यांची आमदारकी रहित केली आहे. चौकशीतून ते अनुसूचित जातीमधील नसल्याचे स्पष्ट झाले. ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणार्‍या इडुकी जिल्ह्यातील देवीकुलम् विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार डी. कुमार यांनी याचिका प्रविष्ट केली होती. डी. कुमार हे ७ सहस्र ८४८ मतांनी राजा यांच्याकडून पराभूत झाले होते. डी. कुमार यांनी आरोप केला होता की. ए. राजा हे धर्मांतरित ख्रिस्ती आहेत. त्यांनी अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारची फसवणूक करणार्‍यांना कारागृहातच टाकणे आवश्यक !