‘ओटीटी’ मंचावरील वाढती शिवीगाळ आणि अश्‍लीलता सहन करणार नाही !

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची चेतावणी !

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (उजवीकडे)

नागपूर – ‘ओटीटी’ मंचावरून निर्मितीच्या नावाखाली केलेली शिवीगाळ आणि अश्‍लीलता सहन केली जाणार नाही, अशी चेतावणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, या संदर्भातील वाढत्या तक्रारींविषयी सरकार गांभीर्याने पहात आहे. यासाठी जर नियमांत पालट करावा लागला, तर सरकार यावर विचार करण्यास सिद्ध आहे. या मंचाला निर्मितीसाठी स्वातंत्र्य दिलेले आहे, अश्‍लीलतेसाठी नाही.

ओटीटी म्हणजे काय ?

‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप.’  आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’ असेही म्हणता येईल. ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, ‘वेब सिरीज’ आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.

संपादकीय भूमिका

‘ओटीटी’साठी ‘सेन्सॉर बोर्ड’ असणे आवश्यक आहे, तरच त्यावरील अशा घटना रोखता येऊ शकतात. सरकारने या दृष्टीने कृती करायला हवी !