सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासाची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

सॅनफ्रान्सिस्को (अमेरिका) – खलिस्तानवाद्यांनी येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर आक्रमण करून तोडफोड केली. आधी त्यांनी येथे खलिस्तानी झेंडे लावल्यावर भारतीय अधिकार्‍यांनी ते काढून टाकल्यानंतर खलिस्तानवाद्यांनी दूतावासाची तोडफोड चालू केली. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या आणि तलवारी होत्या. त्यांना रोखण्यास पोलिसांना अपयश आल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

संपादकीय भूमिका

महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेचे पोलीस अशा घटनांच्या वेळी झोपलेले असतात का ?