महिलांचे चुंबन घेऊन पळणार्‍या धर्मांधांच्या टोळीतील ४ जणांना अटक

जमुई (बिहार) येथील घटना !

जमुई (बिहार) – येथे महिलांचे चुंबन घेऊन पसार होणारा महंमद अक्रम आणि त्याच्या टोळीतील अन्य ३ जण यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातील एक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्यावर त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न चालू केले होते.

पोलिसाच्या माहितीनुसार एक टोळी असून ती महिलांची छेड काढणे, विनयभंग करणे आणि रात्रीच्या वेळी चोर्‍या करणे आदी गैरकृत्ये करते. पोलीस त्यांच्या टोळीतील अन्य जणांची माहिती घेत आहेत. अक्रम याने त्याच्यावरील आरोप मान्य केला आहे. ‘महिलांच्या संदर्भात अशा घटना घडल्या, तरी त्या लाजेखातर पोलिसांत तक्रार करत नसल्याने याविषयीची माहिती मिळत नाही’, असे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

असे घृणास्पद कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !