ऑस्ट्रेलिया पोलिसांकडूनही आता खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ !

नवी देहली – ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खलिस्तानी सार्वमताच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता व्हिक्टोरिया पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला आहे. २ मासांच्या जुन्या प्रकरणात व्हिक्टोरिया पोलिसांनी अचानक खलिस्तानवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख पटण्यासाठी लोकांचे साहाय्य मागितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसमोर भारतविरोधी हिंसाचाराचे सूत्र उपस्थित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. व्हिक्टोरिया पोलिसांनी जनतेला ‘२९ जानेवारी या दिवशी हिंसाचार करणार्‍या ६ जणांना पकडण्यासाठी पोलिसांना साहाय्य करा’, असे आवाहन केले आहे