बांगलादेशात अल्लाचा कथित अवमान केल्यावरून हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास !

फेसबुकवरून अल्लाचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बांगलादेशातील रंगपूर सायबर लवादाने परितोष सरकार या हिंदु तरुणाला ५ वर्षांचा कारावास आणि ३० सहस्र टका (बांगलादेशी चलन), म्हणजे २३ सहस्र ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पाकमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यात घुसून ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपीची हत्या !

ईशनिंदेच्या प्रकरणात हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले व आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.

तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.

विश्‍वविद्यालयांमध्ये विश्‍वाचे ज्ञान दिले जात नाही !  

आध्यात्मिक शिक्षण, म्हणजे न दिसणार्‍या गोष्टी शिकणे. तथापि या गोष्टी शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये शिकवल्या जात नाहीत. तेथे केवळ नोकरी-व्यवसायासाठी शिकवले जाते- ‘टाइम्स’ समूहाचे समीर जैन

रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाला अवैध बांधकामामुळे धोका !

बांधकाम पाडण्यासाठी संंबधितांना नोटीस बजावण्यात आली आहे; मात्र बांधकाम पाडले, तर अवैध बांधकाम झाल्याचे पुरावे नष्ट होणार नाही का ? यामुळे सर्वांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.  

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !

दिवाडी बेटावर पुन्हा श्री सप्तकोटीश्वर मंदिर बांधू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

१२ व्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि पुरातन वास्तूकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटीश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे.

गोव्यात २७ ते ३१ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक घोषणा पूर्ण केल्या आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ला अधिक बळकटी देण्यात आली आहे.

वागातोर येथील ‘ग्लोरी क्लब’च्या विरोधात ध्वनीप्रदूषणावरून गुन्हा नोंद

हणजूण-आश्वे-वागातोर या समुद्रकिनारपट्टीवरील ‘नाईट क्लब’ आणि समुद्रकिनार्‍यावरील उपहारगृहे न्यायालयाच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करतात.

बेतुल किल्ल्याचे (गडाचे) संवर्धन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ! – केपेचे काँग्रेसचे आमदार आल्टन डिकोस्ता

सरकारने हा गड ‘वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे; मात्र किल्ल्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. या किल्ल्यावरून साळ नदी अरबी समुद्राला मिळत असल्याचे विहंगम दृश्य दिसते.