पाकमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यात घुसून ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपीची हत्या !

इस्लामाबाद – ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपी वारिस इसा याचा सूड उगवण्यासाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील हिंसक जमावाने ११ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. यानंतर या जमावाने आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली. वारबर्टन येथील ननकाना साहीब पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

वारिस इसा याची २ वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाल्यानंतर तो घरी परतला होता. तेथे पवित्र ग्रंथांवर स्वतःच्या पूर्वीच्या पत्नीचे छायाचित्र चिकटवून जादूटोणा करत होता. या घटनेचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या आक्रमणातील सहभागी लोकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.