राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसचालक आणि वाहक नाराज !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचालकांना दसर्याच्या दिवशी वाहनांमध्ये पूजा करण्यासाठी राज्य सरकारकडून १०० रुपये देण्यात येतात. या तुटपुंज्या रकमेवर बसचालक आणि वाहक नाराज असल्याचे दिसून येत आहे. राज्यास सध्या पूजेसाठी लागणार्या फुलांची किंमत यापेक्षा अधिक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Karnataka Government allocates a meagre 100 Rupees for #AyudhaPuja of buses
KSRTC drivers and conductors express outrage
This clearly shows that the #Congress Government in Karnataka is giving a meager amount just to show that they are contributing towards the Puja.
The… pic.twitter.com/ucHXYX88P6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
बस कर्मचार्यांचे म्हणणे आहे की, पूजा करण्यापूर्वी त्यांना बसची स्वच्छता आणि सजावट करावी लागेल. महामंडळ पूजेच्या खर्चासाठी केवळ १०० रुपये देत आहे. पूजा करण्यासाठी त्यात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार आहेत.
महामंडळाने पूजेसाठी प्रत्येक विभागीय बस दुरुस्ती केंद्रासाठी १ सहस्र रुपये आणि प्रादेशिक स्तरावरील बस दुरुस्ती केंद्रासाठी प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचे वाटप केले आहेत.
संपादकीय भूमिकाआम्ही पूजेसाठी पैसे देतो, हे दाखवण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकार तुटपुंजी रक्कम देत आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारकडे पूजेसाठी पैसे नाहीत; मात्र महिलांना फुकट प्रवास सेवा देण्यासाठी मात्र पैसे आहेत ! |