हडपसर (जिल्हा पुणे) – येथे एका महिलेला ३ ऑक्टोबर या दिवशी राजेश पारीख, मनीष मेहता अशी नावे असलेल्या व्यक्ती भेटल्या. महिलेच्या पायाला दुखापत झाली असल्याचे हेरून त्यांनी महिलेची माहिती घेतली, आजाराविषयी विचारले. ‘मी आधुनिक वैद्य आहे, अस्थिरोगतज्ञ आहे असे सांगून, घरी येऊन आम्ही तुमच्या पायावर उपचार करू’, असे सांगितले. बरे होण्याच्या आशेने महिलेने त्यांना घरी बोलावले. त्यानंतर त्यांनी डाव्या गुडघ्याजवळ आणि खाली युरिक ॲसिड साठलेले काढून घेतले अन् पायाची नस मोकळी केली. या उपचाराचे मूल्य २ सहस्र १०० रुपये झाले, असे सांगितले आणि ‘पाय पूर्ण बरा करायचा असेल, तर अजून उपचार करू’, असे सांगितले; मात्र त्या उपचारांचे पैसे अधिक मागितले. तेव्हा घरातील इतरांना त्यांच्या हेतूविषयी शंका आल्याने त्यांनी उपचार तिथेच थांबवले आणि ‘आधीचे मूल्य ‘ऑनलाईन’ जमा करू’, असे सांगितले. त्यासाठी ‘फोन पे’ (ऑनलाईन पैसे पाठवण्याची संबंधित आस्थापनाची सुविधा) क्रमांक मागितला असता त्यांनी तो देण्यास आधी टाळाटाळ केली; पण शेवटी पैसे घेण्यासाठी त्यांनी ‘फोन पे’ क्रमांक दिला. त्यावरून ते मुसलमान असल्याचे लक्षात आले. केवळ या महिलेविषयी नव्हे, तर त्या ठिकाणी रस्त्यावरून ये-जा करणार्या अन्य महिलांना हेरून हे दोघेजण आधुनिक वैद्य असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करत आहेत.
संपादकीय भूमिका
|