पुणे येथील श्री पद्मावतीदेवीच्या मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात वैभवी लवाजम्यासह दाखल !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील श्री पद्मावतीदेवीच्या मंदिरात सातव्या माळेस म्हणजे ९ ऑक्टोबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून श्रींची पालखी हरिनाम गजरात वैभवी लवाजम्यासह आली, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. श्री पद्मावती मंदिरात परंपरेने आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराच्या वतीने देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथजी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, मानकरी, सेवक, आळंदी ग्रामस्थ, वारकरी भाविक आदी उपस्थित होते. नवरात्रीनिमित्त श्री पद्मावतीदेवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे.

पद्मावती देवी

ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. येथे आळंदी ग्रामस्थ श्री रानवडे परिवाराच्या वतीने परंपरेने धार्मिक सेवा, पूजा, स्वागत आदी नियोजन केले जाते. त्यानंतर श्रींची पालखी विश्रांतवाडीमार्गे परंपरेने भोसले वस्ती येथे विसावा घेत मंदिरात रात्री हरिनाम गजरात परत आणण्यात आली. भोसले वस्ती येथे मोहन भोसले परिवाराने श्रींच्या पालखीचे स्वागत केले.

भजनात दंग असलेले भाविक