गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

गोव्यातील मडगाव येथील विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप

‘मल्टीपर्पज विद्यालया’च्या विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप !

मडगाव, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘पी.एफ्.आय.’ ही बंदी घातलेली आतंकवादी संघटना काही राजकारण्यांच्या पाठिंब्याने काही मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावून मडगाव परिसरातील विद्यालये आणि महाविद्यालये येथील सौहार्दाचे वातावरण बिघडवत असल्याचा आरोप बोर्डा, मडगाव येथील ‘मल्टीपर्पज विद्यालया’च्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांकडे बोलतांना केला आहे.


१. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हे मुसलमान विद्यार्थी अन्य धर्मीय विद्यार्थ्यांची चेष्टा करतात. त्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात, तसेच याविषयी जाब विचारल्यास मारहाण करण्याची धमकी देतात.

हे मुसलमान विद्यार्थी हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील आहेत. ‘पोलीस तक्रार केल्यास माझ्यासमवेत हाऊसिंग बोर्ड आणि मोती डोंगर येथील नागरिक आहेत’, असे सांगतात. या दोन्ही ठिकाणी मुसलमानांनी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे.

२. एका शिक्षकाने अशा एका विद्यार्थ्यावर कारवाई केल्यावर संबंधित शिक्षकाच्या वाहनाची मुसलमान विद्यार्थ्यांनी तोडफोड केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

३. एका विद्यार्थ्याला विद्यालयाच्या परिसरात मारहाण केल्याच्या घटनेवरून अन्य एका विद्यार्थ्याने संबंधित विद्यालयाचे प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवल्याने संबंधित विद्यार्थ्याला मुसलमान विद्यार्थ्यांनी मारहाण केली. पोलिसांनी तक्रार करणार्‍या विद्यार्थ्याच्या पालकाला ‘या प्रकरणी विद्यालयाचे प्रशासन कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्न केला.

४. अशा स्वरूपाच्या घटना मडगाव परिसरातील अनेक विद्यालये आणि महाविद्यालये येथे घडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.मडगावमधील मुसलमान विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ मडगाव परिसरातील विद्यालये आणि महाविद्यालये येथे मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये ०.५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोचली आहे. काही अनुमानानुसार पुढील दशकाच्या अंती मडगाव परिसरात मुसलमानांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

मडगावमधील मुसलमान विद्यार्थ्‍यांच्‍या संख्‍येत वाढ

मडगाव परिसरातील विद्यालये आणि महाविद्यालये येथे मुसलमान विद्यार्थ्‍यांची संख्‍या गेल्‍या काही वर्षांमध्‍ये ०.५ टक्‍क्‍यांवरून ३० टक्‍क्‍यांवर पोचली आहे. काही अनुमानानुसार पुढील दशकाच्‍या अंती मडगाव परिसरात मुसलमानांची संख्‍या ६० टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्‍याची शक्‍यता आहे.

धर्मांधांची तक्रार करणारा विद्यार्थी आणि शिक्षक यांना पाठिंबा नाही : पालकही चिंतेत !

धर्मांध विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार केल्यावर तक्रार करणारा विद्यार्थी किंवा कारवाई करणारा शिक्षक यांना वर्गातील इतर विद्यार्थी किंवा शिक्षकवर्ग यांचा पाठिंबा लाभत नाही, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. तक्रार करणार्‍या विद्यार्थ्यांचे पालकही चिंतेत आहेत. पालकांच्या मते, त्यांना या प्रकरणी विद्यालयाचे प्रशासन, पोलीस आणि सरकार यांनी पाठिंबा द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतकडे लक्ष द्यावे. (धर्मांधांच्या उद्दामपणाच्या विरोधात संघटीत होऊन वैध मार्गाने कृती केल्यासच त्यांना आळा बसेल, हे लक्षात घ्यावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !
  • या प्रकरणाची चौकशी करून गोवा सरकारने संबंधित हे खरोखरच विद्यार्थी आहेत का ? हे पडताळून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी !
  • मडगावमध्ये असे प्रकार घडत असतांना पोलीस काय करत आहेत ?