परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांविषयी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे.

(म्हणे) ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत !’ – ब्रिटिश सरकार

ब्रिटनने त्याच्या प्रसारमाध्यमांना कसा पाठिंबा द्यावा, हा त्याचा प्रश्‍न असला, तरी त्याची प्रसारमाध्यमे स्वातंत्र्याच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत, त्याकडेही लक्ष द्यायला हवे !

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील अधिकार्‍याला फसवणुकीच्या प्रकरणी सुनावला ३ वर्षांचा सश्रम कारावास !

मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील एका अधिकार्‍याला पदाचा दुरुपयोग करून एका व्यक्तीची ४० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ३ वर्षांच्या सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली आहे.

गढवा (झारखंड) येथील मदरशाच्या मौलवीने केला ६ मुलांवर बलात्कार !

मदरशातील अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे इंग्लंड येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्व मदरशांना टाळे ठोकून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षण देण्याचा कायदा करण्याची आता वेळ आली आहे !

लहान देशांत पैशाला विशेष महत्त्व नसल्याने ते समाधानी ! – वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे

जगाला शाश्‍वत आनंदाचा मार्ग हा हिंदु धर्माने दिला आहे; परंतु भारतातील हिंदू यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे आज केवळ व्यावहारिक यशाच्या मागे धावत आहेत आणि दु:खी होत आहेत. या सर्वांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन साधना करणे, हे लक्षात घ्या !

कोहिनूर हिरा ब्रिटिशांच्या गडद क्रूर वसाहतवादी इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो !

पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्‍यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्‍या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !

संस्कृती जिंवत ठेवण्यासाठी महिलेने बनवला १०८ कलाकारांचा ‘सप्तपदी’ समूह !  

पालटत्या काळानुसार पारंपरिक गीतांची परंपरा लोप पावत आहे. विवाह किंवा अन्य कोणत्याही शुभप्रसंगी गीत गायले जाते. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सूरतमधील ‘सप्तपदी’ या समूहाने केला आहे. याचे नेतृत्व एक महिला करत आहे. यात १०८ कलाकारांचा समावेश आहे.

यंदा होणार्‍या चारधाम यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक भाविकांसाठी नाव नोंदणी अनिवार्य !

हिंदु धर्मात चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांच्या दर्शनासाठी हिंदू कित्येक मासांपासून वाट पहात असतात. ही सर्व तीर्थक्षेत्रे उत्तराखंड राज्यात असून यंदा राज्यशासनाने या यात्रेसाठी काही नियम बनवले आहेत.

उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप !

उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एन्.जी.आर्.आय.ने) व्यक्त केली आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरे, दुकाने, हॉटेल यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.