गुन्हा नोंद झाल्यापासून फरार !
(मौलवी म्हणजे इस्लामी अभ्यासक)

गढवा (झारखंड) – येथील कोइंसी गावात असलेल्या मदरशातील समरुद्दीन नावाच्या मौलवीने जवळपास ६ मुलांवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून तो फरार आहे. त्याची कुकृत्ये तेव्हा समोर आली, जेव्हा १९ फेब्रुवारीच्या रात्री त्याने ३ विद्यार्थ्यांना त्याच्या खोलीत बोलावले. थोड्या वेळाने अन्य दोघांना बाहेर पाठवून तिसर्या मुलाला त्याची मालीश करायला सांगून त्याच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलाने सर्व घटनाक्रम त्याच्या घरी जाऊन सांगितला. तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांनी येऊन मौलवीला यासंदर्भात खडसवले. या वेळी मौलवीने त्याच्या समर्थकांना एकत्र करून गावकर्यांचा विरोध करायला आणि पीडित मुलाच्या कुटुंबियांना मारहाण करायला आरंभ केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
Jharkhand: Maulvi sexually assaults six students in a madarsa on the pretext of getting a massage, attacks family members when they complain
https://t.co/mOGNBJ4HqI— OpIndia.com (@OpIndia_com) February 22, 2023
यानंतर पोलिसांनी पीडित मुलांचा जबाब नोंदवून मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. तेव्हापासून तो फरार आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार समरुद्दीन हा मूळचा बंगाल येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून दारुल उलूम सामसिया नावाच्या मदरशात मुलांना शिकवतो. या मदरशात एकूण ५० मुले शिक्षण घेतात.
संपादकीय भूमिकामदरशातील अशा प्रकारचे घृणास्पद प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे इंग्लंड येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्व मदरशांना टाळे ठोकून सर्व मुलांना मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षण देण्याचा कायदा करण्याची आता वेळ आली आहे ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन