(म्हणे) ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत !’ – ब्रिटिश सरकार

भारतात बीबीसीच्या कार्यालयांच्या आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचे प्रकरण

लंडन (ब्रिटन) – भारतातील मुंबई आणि देहली येथील बीबीसीच्या कार्यालयांचे आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा ब्रिटन सरकारने विरोध केला आहे. ब्रिटन सरकारने ‘आम्ही बीबीसीच्या मागे खंबीरपणे उभे आहोत’, असे संसदेत म्हटले आहे.

ब्रिटन सरकारकडून बीबीसीला अर्थपुरवठा केला जातो. ब्रिटनचे उपमंत्री डेविड रटली यांनी संसदेत म्हटले की, आमचे सरकार भारताच्या आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर विधान करणार नाही; मात्र आम्ही प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यांचे नेहमीच समर्थन करत रहाणार आहोत. आम्हाला वाटते की, बीबीसी ही जागतिक सेवा देणारे माध्यम आहे. बीबीसीला संपादकीय स्वतंत्र्य मिळायला हवे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनने त्याच्या प्रसारमाध्यमांना कसा पाठिंबा द्यावा, हा त्याचा प्रश्‍न असला, तरी त्याची प्रसारमाध्यमे स्वातंत्र्याच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत, त्याकडेही लक्ष द्यायला हवे !