वायनाड (केरळ) – महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह केरळमधील वायनाड, महाराष्ट्रातील नांदेड, तसेच बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघांत पोटनिवडणूकही घोषित करण्यात आली आहे. अशातच काँग्रेसने वायनाडमधील पोटनिवडणुकीसाठी प्रियांका वाड्रा यांना उमेदवारी घोषित केली आहे. येथे १३ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली अशा दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवली अन् जिंकली होती. त्यामुळे गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचे त्यागपत्र दिले होते. तेथे आता त्यांनी त्यांच्या बहिणीला उमेदवारी दिली आहे. (घराणेशाही जोपासणारा काँग्रेस पक्ष ! – संपादक)
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या कुबड्यांखेरीज गांधी कुटुंबाला कुठलाच आधार नसल्याने प्रियांका यांना मुसलमानबहुल वायनाड येथून उभे रहाण्याविना दुसरा पर्याय नाही, याला कोण काय करणार ? |