भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील मुत्यालम्मा मंदिरात घुसून देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याच्या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी सलीम सलमान ठाकूर नावाच्या मुसलमान तरुणाला अटक केली. सिकंदराबाद येथील हॉटेलमधून मशिदीकडे जात असतांना मंदिरावर आक्रमण केल्याची स्वीकृती सलीमने दिली.
🛑 Vigraha of Muthyalamma devi vandalized : Salim, who vandalized the deity’s murti by entering the temple in Telangana’s Bhagyanagar has been arrested
👉 Such incidents will not stop as long as the descendants of Mohammad Ghazni still exist in #India and are not held… pic.twitter.com/pb81UCLqEQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2024
१. पोलिसांनी सांगितले की, सलीमसह इतर काही धर्मांधांनी भाग्यनगरमधील कुरमागुडा भागातील मुत्यालम्मा मंदिरातील देवीची मूर्ती तोडल्यानंतर सिकंदराबादमध्ये तणाव निर्माण झाला.
२. स्थानिक हिंदूंनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरत आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकार्यांनी सुरक्षाव्यवस्था कडक केली असून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
३. स्थानिकांनी मंदिराजवळ निदर्शने करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या निदर्शनात भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. या वेळी भाग्यनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
४. या वेळी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंदिरात जाऊन त्यानंतर आंदोलकांची भेट घेतली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकामहंमद गझनीचे वंशज भारतात आजही असून त्यांच्यावर वचक बसत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत ! |