मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील अधिकार्‍याला फसवणुकीच्या प्रकरणी सुनावला ३ वर्षांचा सश्रम कारावास !

विशेष न्यायालयाने ठरवले होते निर्दोष !

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने न्यायालयातील एका अधिकार्‍याला पदाचा दुरुपयोग करून एका व्यक्तीची ४० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी ३ वर्षांच्या सश्रम कारावासीची शिक्षा सुनावली आहे. अधिकार्‍याने संबंधित व्यक्तीला नोकरी देण्याचे खोटे आश्‍वासन देऊन तिची फसवणूक केली होती. वर्ष २०१५ मध्ये एका विशेष न्यायालयाने या अधिकार्‍याला निर्दोष ठरवले होते. व्ही.डी. मोहनकृष्णन् असे या अधिकार्‍याचे नाव आहे. त्याला ५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.