संस्कृती जिंवत ठेवण्यासाठी महिलेने बनवला १०८ कलाकारांचा ‘सप्तपदी’ समूह !  

विवाहादी शुभप्रसंगी सादर करतात पारंपरिक गीते !

सूरत (गुजरात) – पालटत्या काळानुसार पारंपरिक गीतांची परंपरा लोप पावत आहे. विवाह किंवा अन्य कोणत्याही शुभप्रसंगी गीत गायले जाते. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सूरतमधील ‘सप्तपदी’ या समूहाने केला आहे. याचे नेतृत्व एक महिला करत आहे. यात १०८ कलाकारांचा समावेश आहे. अलीकडेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत याच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात या समूहाने सादरीकरण केले.

समूहाच्या संस्थापक वैशाली गोहिल यांनी सांगितले की, ८ वर्षांपूर्वी २ मुलींसह प्रारंभ झालेला हा समूह आता १०० हून अधिक कलाकारांचा बनला आहे. संघात १४ मुली आहेत. ३६ ब्राह्मण, २६ तालवादक, १० सितार वादक, १० व्हायोलिन वादक, ६ सनई वादक आणि संगीतकार यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. भारतीय संस्कृतीची ओढ असल्याने आम्ही हे काम करत आहोत. विवाहामध्ये पाश्चात्त्य संगीत असायला हरकत नाही; पण पारंपरिक गाणीही असली पाहिजेत. आपली संस्कृती समृद्ध आहे, प्रत्येक विधीसाठी वेगवेगळी गाणी आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही गीते सादर करतो. प्रत्येक प्रसंग आणि आवडीनुसार ४०० हून अधिक गाणी आहेत. समूहातील ब्राह्मण सदस्य विवाह विधींच्या वेळी मंत्रोच्चारणदेखील करतात.