मधेपुरा (बिहार) येथील महाविद्यालयाच्या परिसरात श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास बंदी !

महाविद्यालयात विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास अनुमती नाकारणे, हे शिक्षण क्षेत्राचे अधःपतनच होय !

श्री कालीमातेला सिगरेट ओढतांना दाखवणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला स्थगिती !

श्री कालीमातेचे आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्‍या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लीना यांनी त्यांच्या माहितीपटामध्ये श्री कालीमातेला हातात समलैंगिकतावाल्यांचा झेंडा घेऊन सिगरेट ओढतांना दाखवले होते.

नागपूर येथे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या विरोधात विहिंपचे आंदोलन !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

कटिहार (बिहार) येथे ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक !

सरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

मदरशांतील मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अन्य शाळांत शिक्षण घेऊ देण्यास उत्तरप्रदेश मदरसा बोर्डाचा नकार !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आता सरकारने यात हस्तक्षेप करून मदरशांमध्ये मुसलमानेतरांना शिक्षण देण्यावर बंदी घालून त्याची कठोर कार्यवाही करावी, असेच हिंदूंना वाटते !

‘फायझर’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कोरोनावरील कुचकामी लसीशी संबंधित प्रश्‍नांकडे दुर्लक्ष  !

राहुल गांधी, पी चिदंबरम् आणि जयराम रमेश हे विदेशी लसींना भारतात प्रोत्साहन देत होते ! – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री

नथुराम गोडसे यांना खलनायक ठरवल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडू !

‘गांधी गोडसे – एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे ‘प्रमोशन’ चालू आहे. मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन चालू असतांना ‘अमर हुतात्मा हिंदु महासभे’ने निर्मात्यांना काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शित केला.

पेठवडगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरी पार पडली !

२२ जानेवारी या दिवशी वडगाव येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित करण्‍यात आली आहे. त्या निमित्ताने २० जानेवारीला वाहनफेरी काढण्‍यात आली. या फेरीसाठी ६५ दुचाकी आणि १३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्‍याच्‍या वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !

आमदारांना कारवाई करण्‍याविषयीची मागणी का करावी लागते ? वरिष्‍ठ पोलीस अधिकारी काय करतात ?

दारू विक्रेत्‍याकडून ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरसेवकाला अटक !

परवानाधारक दारूच्‍या दुकानाच्‍या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्‍यासाठी ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना नगरपंचायत नगरसेवक अनिल उत्तमराव गेडाम यवतमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.